रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत औंध येथे झोपडपट्टी हक्क मेळावा संपन्न

औंध : औंध मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत डी.पी.रोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)औंध विभाग यांच्या वतीने झोपडपट्टी हक्क मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याचे उद्घाटन गंगाधर जी आंबेडकर (वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष रिपाइं) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रमेश ठोसर(पुणे शहर नेते रिपाइं) यांनी केले होते. या वेळी प्रमुख उपस्थिती महेंद्र कांबळे(मा.पुणे शहराध्यक्ष), संजय कांबळे(नेते पुणे शहर), तुकाराम गाडे (सचिव पुणे शहर रिपाइं), शकुंतला शेलार(सा.कार्यकर्त्या)यांनी मार्गदर्शन केले.

वसाहतीतील प्रत्येक झोपडीधारकाला घर देण्यात यावे.कोणालाही बेघर करू नये. झोपडीधारकांचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करण्यात यावे.योजना जास्तीत जास्त 2-3 वर्षात पूर्ण करून देण्यात यावी.तसेच सोसायटी साठी क्लब हाऊस व गार्डन करण्यात यावे.विकासकाने हे सर्व मुद्धे स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यात यावे असा ठराव करण्यात आला.

नागरिकांना आपले विचार मांडण्याची संधी यावेळी मिळाली. तसेच यावेळी लखन गायकवाड, योगेश भोसले, मिलिंद कदम, रणजित लोखंडे, संदीप ससाणे,संदीप ठोसर, बबन निरवणे, गजेंद्र चौधरी, दिलीप गायकवाड, नंदू ठोसर,दत्ता कांबळे, शशिकांत ओव्हाळ,हिराताई घोडराव, छबुताई उदागे,सखुबाई सरवदे, कमलताई गायकवाड,नंदाताई ससाणे,शारदाताई राक्षे,सुषमाताई पवळ, बहुसंख्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत मधील नागरिक,महिला, युवक व विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

See also  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते चिवरदान व धम्मदान अर्पण