पिंपळे निलख : पिंपळे निलखचा ‘विघ्नहर्ता’ श्री गणेश मित्र मंडळ ट्रस्ट गणेश नगर औंध कॅम्प पुणे २७ येथे बाप्पांचे आगमन आनंदात व प्रसन्न वातावरणा मध्ये ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले.
सोहळ्या वेळी मंडळाचे आधारस्तंभ प्रकाश बालवडकर, मंडळाचे अध्यक्ष श्री.सागर साठे पाटील, उपाध्यक्ष देविदास भोर, उपाध्यक्ष कु.महेश भाऊ सूर्यवंशी, उत्सव समिती अध्यक्ष श्री स्वप्नील भाऊ सोनवणे यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह व भक्ती भावाने भरलेल्या या आगमन सोहळ्यात वातावरण गणेशमय भक्ती मय झाले .
श्री गणेशा ढोल ताशा पथकाच्या दमदार वादनाने सोहळ्याला विशेष उत्साह लाभला. दणदणाटी तालावर भक्तांनी बाप्पांना वंदन केले आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने परिसर दुमदुमून गेला.यंदा मंडळाने साकारलेला देखावा विशेष आकर्षण ठरत आहे. ‘बारा ज्योतिर्लिंग दर्शन’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित हा देखावा भाविकांच्या दर्शनासाठी मांडण्यात आला असून, कार्यकर्त्यांनी त्यास अत्यंत भक्तिपूर्वक व कलात्मकतेने सिद्ध केले आहे. यंदाचे वर्ष हे मंडळाच्या स्थापनेचे ४१वे वर्ष आहे. चार दशकांहून अधिक काळापासून पिंपळे निलख मध्ये सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये योगदान देणारे हे मंडळ आहें आजही परिसरातील गणेश भक्तांसाठी एक विश्वासाचे व आकर्षणाचे केंद्रस्थान ठरले आहे.
गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच मंडळातील महिला कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने उत्सवाला मोठ्या प्रमाणावर रंगत आली आहे.