राज्यपाल रमेश बैस यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठा आरक्षणा संदर्भात निवेदन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील व राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यासाठीचे निवेदन दिले.

महाराष्ट्रामध्ये अंतरवाली सराटी जालना येथे मनोज जरंगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात उपोषण सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून कार्यवाही होणे आवश्यक आहे. याबाबत राज्यपाल बैस यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भेट घेण्यात आली व निवेदन देण्यात आले.

See also  देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे