बँकांच्या सुट्या ह्या भारतामध्ये सर्वसामान्यांच्या व्यवहारांना प्रभावित करणारी गोष्ट असल्याने बँकांच्या सुट्या जाणून घेणे सामान्यांसाठी महत्वाचे असते.
येत्या एप्रिल महिन्यात सरकारी व खाजगी अशा सर्व बँकांना जवळपास १५ दिवसांच्या सुट्या आहेत.
या सुट्या प्रत्येक राज्या राज्यांमध्ये थोडया फार मागे पुढे होऊ शकतात मात्र साधारणपणे साप्ताहिक सुट्या दुसरा व चौथा शनिवार व या महिन्यात येणारे सण व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त येणाऱ्या एकूण सुट्ट्या हा जवळ पास १५ दिवसाच्या होतात.
शनिवार १ एप्रिल — इयर एन्ड
रविवार २ एप्रिल — साप्ताहिक सुट्टी
मंगळवार ४ एप्रिल — महावीर जयंती
बुधवार ५ एप्रिल — बाबू जगजीवन राम जयंती ( फक्त हैदराबाद मधील बंद )
शुक्रवार ७ एप्रिल — गुड फ्रायडे
शनिवार ८ एप्रिल — दुसरा शनिवार
रविवार ९ एप्रिल — साप्ताहिक सुट्टी
शुक्रवार १४ एप्रिल — डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर प्रादेशिक सण.
शनिवार १५ एप्रिल — बंगाली नाव वर्ष, विशू व इतर प्रादेशिक सण.
रविवार १६ एप्रिल — साप्ताहिक सुट्टी
मंगळवार १८ एप्रिल — शब इ कादर (फक्त जम्मू काश्मीर भागात बंद )
शुक्रवार २१ एप्रिल — ईद उल फित्र
रविवार २३ एप्रिल — साप्ताहिक सुट्टी
रविवार ३० एप्रिल — साप्ताहिक सुट्टी