बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर होणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे.

या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल पाहता येणार

mahresult.nic.inhttp://hscresult.mkcl.org

http://hscresult.mkcl.org

https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board ५ https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-

12th result- 2023

http://mh12.abpmajha.com

पुणे बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. कोरोनानंतर पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्यात आली, पण त्यावेळी कॉपीमुक्त परीक्षेसाठी ‘नांदेड पॅटर्न’ राबविला. त्यामुळे निश्चितपणे कॉपी प्रकरणांमध्ये मोठी घट झाल्याचे पहायला मिळाले. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे (२५ मे) दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे.

See also  ना आश्वासन, ना तारीख थेट संवाद द्वारे जागेवर निर्णय,पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरुडमधील उपक्रमाचा तिसरा टप्पा