बाणेर : बाणेर स.नं. १०४/१/१ या मिळकतीवर संमतीपत्र क्र. सीसी/३५४९/२२ दि.२९/३/२०२३ अन्वये अंतिम दुरुस्त नकाशे मान्य केलेले आहेत.प्रकरणी पथ विभाग, पुणे म.न.पा. यांनी स.नं. २३/३/३९, २३/१/१/२८ २९/२३/२३/६ए + ६ बी, विवांता बालेवाडी या मिळकतीवरील मे. मालपाणी इस्टेट यांचे बांधकाम प्रकल्पास विनापरवाना विद्युत केबल टाकणेकरिता विनापरवाना रस्ता खोदाई केल्यामुळे नमूद बांधकाम प्रकल्पास (मे. मालपाणी इस्टेट) यांना र.रु. १,२८,०१,६००/- इतका दंड लावण्यात आला होता. सदर दंड विकसक यांनी न भरल्यामुळे स.नं. १०४/१/१, बाणेर या मिळकतीवर आकारणेस व सदर प्रकल्पास काम थांबवा नोटीस बजावण्यात आली आहे.
शहर अभियंता पुणे महानगरपालिका यांनी नोटीसीद्वारे मालपाणी यांना काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. बालेवाडीमधील प्रकल्पाचे जागामालक हे मे. मालपाणी इस्टेट आशिष एम. मालपाणी हे आपण असून सदर प्रकल्पाचे संपूर्ण भोगवटापत्र झालेले आहे. तसेच बाणेर स.नं. १०४/१/१ या बांधकाम प्रकल्पाचे जागामालक मे. इन्फिनाईट स्पेसेस तर्फे श्री. मनोहर राजवानी, श्री. दिलीप भगवानी आणि मे. मालपाणी व्हेंचर्स प्रा.लि. तर्फे श्री. आशिष मालपाणी असे असल्याचे दिसून येते. दोन्हीही प्रकल्पांच्या जागामालकांच्या नावामध्ये आपले नाव म्हणजेच श्री. आशिष मालपाणी हे नाव सामाईक असल्याचे दिसून येते.
तरी, पथ विभागामार्फत प्राप्त पत्राचे अनुषंगाने विनापरवाना विद्युत केबल खोदकामाकरिता केलेल्या र.रु. १,२८,०१,६००/- इतकी दंडात्मक रक्कम भरण्याची पूर्तता होईपर्यंत आपले बाणेर स.नं. १०४/१/१ या मिळकतीवर चालू असलेले बांधकाम ही नोटीस मिळताच ताबडतोब थांबविण्यात यावे असे आदेश पुणे मनपाच्या बांधकाम विभागाने दिले.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे “कलम ४३३ (क) अनुसार या अधिनियमात अन्यथा तरतूद करण्यात आली असेल त्या व्यक्तिरिक्त पदनिर्देशित अधिकाऱ्याने काढलेली नोटीस, काढलेला कोणताही आदेश किंवा दिलेला कोणताही निदेश, यांना कोणत्याही दाव्यामध्ये किंवा इतर कायदेशीर कार्यवाहीमध्ये हरकत घेता येणार नाही” याची नोंद घ्यावी असे कळवले. रयत स्वाभिमानी संघटनेच्या मागणीला मोठे यश मिळाल्याचे ऋषिकेश कानवटे यांनी सांगितले.