रा. स्व. संघाचा विजयादशमी उत्सव आणि पथसंचलन, बाणेर बालेवाडी, पाषाण आणि सुस, म्हाळूंगे भागात शताब्दी वर्ष उत्साहाने साजरे

पाषाण : १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी स्थापन झालेला संघ ह्या वर्षी आपली शताब्दी साजरी करत आहे. ह्या निमित्याने संपूर्ण विश्वात हे शताब्दी वर्ष उत्साहाने साजरा होत आहे. त्याप्रमाणे पुण्याच्या बाणेर बालेवाडी, पाषाण आणि सुस म्हाळूंगे भागात तो विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर उत्साहाने साजरा केला गेला. संघाच्या कामाच्या दृष्टीने ही तीन वेगळी नगर असल्याने विजयादशमीचा उत्सव आणि पथसंचलन तीन ठिकाणी संपन्न झाला.

सर्व प्रथम २ ऑक्टोबरला सकाळी सुस म्हाळुंगे नगरात साजरा केला गेला. सकाळी ७:३० वाजता म्हाळुंगे येथील मोहोळ विद्यालयातून पथसंचलन सुरु झाले. ते म्हाळुंगे गावातून जात बालेवाडी स्टेडियम मध्ये संपले. त्यानंतर विजयादशमी उत्सव बालेवाडी स्टेडियम संपन्न झाला. उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दिनेश अंमळनेरकर (former Director, Center for Materials for Electronics) तर प्रमुख वक्ते श्री सुनील देसाई (शारीरिक प्रमुख रा. स्व. संघ पश्चिम क्षेत्र) होते. तसेच संघाच्या विद्यापीठ भागाचे कार्यवाह श्री संजय वाघुळदे उपस्थित होते. एकूण ३१० स्वयंसेवकांनी तर १५० हून अधिक नागरिकांनी उत्सवात भाग घेतला.संध्याकाळी बाणेर, बालेवाडी आणि पाषाण नगरात विजयादशमीचा उत्सव आणि पथसंचलन संपन्न झाले. बाणेर, बालेवाडी मध्ये हायस्ट्रीट वरून पथसंचलन दुपारी ४ वाजता सुरु झाले आणि हायस्ट्रीट सिमेंट मैदानावर संपले. त्यानंतर विजयादशमी उत्सव हायस्ट्रीट सिमेंट मैदानावर संपन्न झाला. उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. अनुराधा ओक (आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद) तर प्रमुख वक्ते श्री रोहित रिसबूड (पुणे महानगर प्रचारक रा. स्व. संघ). तसेच संघाच्या विद्यापीठ भागाचे सह कार्यवाह श्री सारंग वाबळे उपस्थित होते. एकूण ४५७ स्वयंसेवक तर ३५० हून अधिक नागरिकांनी भाग घेतला.

पाषाण नगरात संध्याकाळी दुपारी ४ वाजता पथसंचलन निघाले आणि विजयादशमी उत्सव वरदायिनी सोसायटीच्या मैदानावर संपन्न झाला. उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ नवीन कुमार (डायरेक्टर – राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था) तर प्रमुख वक्ते डॉ प्रवीण दबडगाव (प. म. प्रांत कार्यवाह रा. स्व. संघ). एकूण ४४५ स्वयंसेवक तर ५०० हून अधिक नागरिकांनी भाग घेतला.

तीनही पथसंचलन मार्गात अनेक माता भगिनी, नागरिक आणि विविध संघटनांनी रांगोळ्या, पुष्पवृष्टी करून पथसंचालनाचे स्वागत केले. विविध संस्थांनी स्वागत कमानी उभारून, मंगल वाद्य वाजवून पथसंचालनाचे स्वागत केले. बाणेर मध्ये केशव शंख पथकाने शंख वादन करून स्वागत केले. संघ ह्यावर्षी समाजात पंच परिवर्तन हा विषय घेऊन जात आहे. तीनही प्रमुख वाक्यांनी ह्या पाच विषयांची उपस्थित नागरिकांना माहिती करून दिली. नागरी शिष्टाचार, स्वबोध, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण हे पाच विषय घेऊन समाजाचे संपूर्ण परिवर्तन करण्याचा संघाचा मानस तीनही प्रमुख वाक्यांनी समाजासमोर ठेवला. शताब्दी वर्षात आगामी काळात प्रत्येक कुटुंबापर्यंत संपर्क करून संघ समजावण्याचे अभियान संघ करणार आहे तसेच प्रत्येक वस्ती मध्ये विराट हिंदू संमेलन घेण्यात येतील. ह्या दोनही उपक्रमाला संपूर्ण समाजाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. तत्पूर्वी स्वयंसेवकांनी विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केलीत. ह्या रीतीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे, राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

See also  औंध बाणेरक्षत्रीय कार्यालयात मोहल्ला कमिटीची बैठक नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे सहाय्यक आयुक्तांचे आश्वासन

संध्याकाळी बाणेर, बालेवाडी आणि पाषाण नगरात विजयादशमीचा उत्सव आणि पथसंचलन संपन्न झाले. बाणेर, बालेवाडी मध्ये हायस्ट्रीट वरून पथसंचलन दुपारी ४ वाजता सुरु झाले आणि हायस्ट्रीट सिमेंट मैदानावर संपले. त्यानंतर विजयादशमी उत्सव हायस्ट्रीट सिमेंट मैदानावर संपन्न झाला. उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. अनुराधा ओक (आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद) तर प्रमुख वक्ते श्री रोहित रिसबूड (पुणे महानगर प्रचारक रा. स्व. संघ). तसेच संघाच्या विद्यापीठ भागाचे सह कार्यवाह श्री सारंग वाबळे उपस्थित होते. एकूण ४५७ स्वयंसेवक तर ३५० हून अधिक नागरिकांनी भाग घेतला.

पाषाण नगरात संध्याकाळी दुपारी ४ वाजता पथसंचलन निघाले आणि विजयादशमी उत्सव वरदायिनी सोसायटीच्या मैदानावर संपन्न झाला. उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ नवीन कुमार (डायरेक्टर – राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था) तर प्रमुख वक्ते डॉ प्रवीण दबडगाव (प. म. प्रांत कार्यवाह रा. स्व. संघ). एकूण ४४५ स्वयंसेवक तर ५०० हून अधिक नागरिकांनी भाग घेतला.

तीनही पथसंचलन मार्गात अनेक माता भगिनी, नागरिक आणि विविध संघटनांनी रांगोळ्या, पुष्पवृष्टी करून पथसंचालनाचे स्वागत केले. विविध संस्थांनी स्वागत कमानी उभारून, मंगल वाद्य वाजवून पथसंचालनाचे स्वागत केले. बाणेर मध्ये केशव शंख पथकाने शंख वादन करून स्वागत केले. संघ ह्यावर्षी समाजात पंच परिवर्तन हा विषय घेऊन जात आहे. तीनही प्रमुख वाक्यांनी ह्या पाच विषयांची उपस्थित नागरिकांना माहिती करून दिली. नागरी शिष्टाचार, स्वबोध, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण हे पाच विषय घेऊन समाजाचे संपूर्ण परिवर्तन करण्याचा संघाचा मानस तीनही प्रमुख वाक्यांनी समाजासमोर ठेवला. शताब्दी वर्षात आगामी काळात प्रत्येक कुटुंबापर्यंत संपर्क करून संघ समजावण्याचे अभियान संघ करणार आहे तसेच प्रत्येक वस्ती मध्ये विराट हिंदू संमेलन घेण्यात येतील. ह्या दोनही उपक्रमाला संपूर्ण समाजाने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. तत्पूर्वी स्वयंसेवकांनी विविध शारीरिक प्रात्यक्षिके सादर केलीत. ह्या रीतीने संपूर्ण परिसरात उत्साहाचे, राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.

See also  विकसीत, सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पुण्याचे संकल्पपत्र