माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते बालेवाडी येथील हायस्ट्रीट -२चे उद्घाटन

बालेवाडी  : बालेवाडी ममता चौक ते वाकड पुलाकडे जाणार्या रस्त्यातील फेज २ चे लोकार्पण पुण्याचे माजी महापौर प्रदेश भाजपा सरचिटणीस तसेच पुणे लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेद्वार मा.श्री.मुरलीधर आण्णा मोहोळ Murlidhar Mohol  व पुणे शहर भाजपा अध्यक्ष मा.श्री.धिरज घाटे Dheeraj Ghate यांच्या हस्ते संपन्न झाले.


गेली अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या व पुणे महानगरपालिकेने सन २०१५-१६ साली ४० कोटी रुपये खर्च करुन उभा असलेल्या बालेवाडी वाकड पुलाकडे जाणारा हा रस्ता आता पुर्णत्वास येत आहे.
 मागील अनेक वर्षांपासुन या रस्त्याकरीता निधी उपलब्ध व्हावा व तातडीने हा रस्ता पु्र्ण करुन बाणेर बालेवाडी येथील वाहतुक कोंडीची गंभिर समस्या सुटावी याकरीता माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका सौ.ज्योती कळमकर तसेच सौ.स्वप्नाली  सायकर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो.
अमोल बालवडकर यांनी सांगितले, अलिकडच्या काळात मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी या रस्त्याकरीता भरघोस निधी उपलब्ध करुन दिला व  या रस्त्यातील फेज २ चे लोकार्पण संपन्न झाले. सदर रस्त्यातील ७०% रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे तरी उर्वरीत ३०% जागेच्या भुसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असुन लवकरच हा रस्ता देखिल पुर्ण करण्यात येईल तसेच संपुर्ण रस्ता बालेवाडी-वाकड पुलापर्यंत नागरीकांसाठी खुला करण्यात येईल.
                    

 या नविन रस्त्याच्या उद्धाटनाच्या निमित्ताने  अमोल बालवडकर फांऊंडेशच्या वतीने “हॅपी स्ट्रिट बालेवाडी २०२४” चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खेळ, डान्स, झुंबा, लाईव्ह म्युजिक, बॅडमिंटन, टॅटु आर्टिस्ट, मर्दानी खेळ, बालजत्रा, कॅरम, जादुगार अशा विविध प्रकारच्या मनोरंजनाचे देखिल आयोजन करण्यात आले होते. या हॅपी स्ट्रिट कार्यक्रमात बाणेर-बालेवाडी- सुस-म्हाळुंगे-पाषाण -सोमेश्वरवाडी-सुतारवाडी भागातील शेकडो नागरीकांनी, चिमुकल्यांनी, महिलांनी व ज्येष्ठ नागरीकांनी आपल्या परिवारासह उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला.
                  तसेच यावेळी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील स्केटींग प्रेमिंकरीता विविध वयोगटातील स्केटींग स्पर्धेचे देखिल आयोजन केले गेले होते. यामधील विजयी स्पर्धकांना मेडल व पारितोषक देवुन सन्मानित केले गेले.
                       यावेळी पुण्यनगरीचे मा.महापौर प्रदेश भाजपा सरचिटणीस तसेच पुणे लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेद्वार मा.श्री.मुरलीधर आण्णा मोहोळ व पुणे शहर भाजपा अध्यक्ष मा.श्री.धिरजजी घाटे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर,  मा.नगरसेविका ज्योतीताई कळमकर, मा.नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, मा.नगरसेविका हर्षालीताई माथवड, पुनितजी जोशी, सचिनजी पाषाणकर, डॅा.संदिपजी बुटाला, मा.महापौर दत्तात्रयजी गायकवाड, प्रकाशतात्या द. बालवडकर, प्रकाशतात्या कि. बालवडकर, गणेशजी कळमकर, प्रल्हादजी सायकर, लहुशेठ बालवडकर, नारायणजी चांदेरे, अनिलबाप्पु ससार, शशिकांतजी बालवडकर, ह.भ.प.संजयबाप्पु बालवडकर, आत्मारामतात्या बालवडकर, उमाताऊ गाडगीळ, काळुरामजी गायकवाड, दिनेशजी माथवड, शरदजी भोते, नितीनजी रनवरे, संतोषजी बालवडकर, माऊलीतात्या बालवडकर, अस्मिताताई करंदिकर, शिवम बालवडकर, मोरेश्ररजी बालवडकर, सुभाषजी भोळ, रोहनजी कोकाटे, राजेंद्रजी पाडाळे, प्रमोदजी कांबळे, कल्याणीताई टोकेकर, विवेकजी मेथा, रीनाताई सोम्मैया, निलेशजी सायकर, मंदारजी राराविकर, वैशालीताई कमाजदार, यश ताम्हाणे, मिनाताई पारगावकर, कविता साठे, मनोज दळवी, अनिल प्रधान, सुमित कांबळे, बाबाराव गित्ते, रोनक गोटे, भारतीय जनता पार्टी कोथरुड विधानसभेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच औंदुबर ग्रुप बालेवाडी, अष्टविनायक मित्र मंडळ बालेवाडी व अमोल बालवडकर फाऊंडेशचे सर्व सभासद तसेच असंख्य नागरीक उपस्थित होते.

See also  संविधानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस कायम कटिबद्ध : पृथ्वीराज चव्हाण