पाषाण : सुसखिंड परिसरातील तीव्र उताराच्या सर्विस रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात पडलेली खडी व काँक्रीट यामुळे दुचाकी वाहून चालकांच्या गाड्या घसरून अपघात होत आहेत. खडी तातडीने उचलण्यात यावी तसेच खडी पाडणाऱ्या काँक्रीट ट्रकवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
सुस रस्त्यावरील महामार्गावरील पुल, सुस कडून पाषाणकडे येताना पूल ओलांडून बाणेर तसेच महामार्गाकडे जाताना पुल उतरताना लगेच तीव्र उतार आहे. ह्या उतारावर गेली महिनाभर झाले रोडवरच खडी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्या खडी वरून दुचाकी चालक घसरून दिवसा उजेडा दोन तीन अपघात होत आहेत. व रात्रीच वेगळेच मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. काही नागरिकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले आहे. रस्त्यावरील खडी व काँक्रीट मुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
सदर खडी उचलावी तसेच येत्या २४ तासात खडी उचलली गेली नाही तर मनसे स्टाईल रास्तारोको आंदोलन केले जाईल. तसेच होणाऱ्या अपघातास आपणास जबाबदार धरले जाईल याची नोंद घ्यावी. अशाप्रकारचे निवेदन महापालिका आयुक्त, पुणे महानगर पालिका यांना देण्यात आले. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, पांडुरंग सुतार, अजय नेवसे, शिवम दळवी, प्रेमनाथ उमाप, संदीप काळे, योगेश शिंदे व किशोर इंगवले उपस्थित होते.