बाणेर पोलीस स्टेशन मध्ये मोफत कर्करोग आरोग्य तपासणी शिबिर

बाणेर : अमनोरा येस फाउंडेशन, ससून सर्वोपचार रुग्णालय , रोटरी क्लब ऑफ कात्रज, UE lifesciences आणि Cipla breathfree यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये आरोग्य तपासणी  शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत ,पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती अलका सरग, ससून रुग्णालयचे डॉ.विशाखा अय्यर
Amanora yess foundation चे श्री विवेक कुलकर्णी,गोपेंद्र पाटसकर, Ue lifesciences च्या सौ गंधाली देसाई ,Cipla breathfree चे श्री. अनिकेत उपस्थित होते.

चंद्रशेखर सावंत म्हणाले,”आपली दैनंदिन काम सुरूच असतात पण काही वेळा ती बाजूला ठेवून अशा तपासण्यांसाठी आपण नक्कीच वेळ काढला पाहिजे व पुढे येऊन मनात कोणतीही भीती न ठेवता हे तपासणी करून घेतली पाहिजे .”

या मध्ये महिला पोलिस अधिकारी आणि  कुटुंबियांसाठी आय ब्रेस्ट exam या मशीन द्वारे रेडिएशन मुक्त, वेदनारहित अशी सुरक्षित स्तन कर्करोग पूर्वतपासणी करण्यात आली. तसेच सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची फुफ्फुस क्षमता चाचणी ही करण्यात आली. या दोन्ही तपासण्यांचा एकूण 90 हून अधिक जणांनी लाभ घेतला.

सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्यासाठी वेळ निघू शकत नाही अशा महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी चौकीतच ही तपासणी ठेवल्याबद्दल सर्व आयोजकांचे पोलीस निरीक्षक गुन्हे
श्रीमती अलका सरग यांनी आभार मानले.

See also  जगद्गुरु तुकाराम महाराज पालखीचे व श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पुण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दर्शन