मांजरी : गेल्या आठवड्यात गोपाळपट्टी, मांजरी येथील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघाताची दखल शिवसेना मांजरी शाखेने घेतली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, अपघातस्थळी स्ट्रीट लाईटचे खांब बसवावेत, अशी मागणी क्षेत्रीय कार्यालयातील सहायक अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनाद्वारे परिसरातील अपुऱ्या प्रकाशामुळे वारंवार होणाऱ्या अपघातांवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना उपशहर संघटक सूरज मोराळे, शिवसेना मांजरी प्रभाग प्रमुख स्वप्नील वसवे, शाखा प्रमुख बाळासाहेब खरोसे, युवासेना हडपसर विधानसभा सरचिटणीस किरण जाधव, तसेच शिवसैनिक राहुल नांदे आणि गौरव परदेशी उपस्थित होते