सुतारवाडी मराठा सहाय्यक संस्थेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील दुधी व लाखी गावातील पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य किट वाटप

सुतारवाडी : सुतारवाडी मराठा सहाय्यक संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील दुधी व लाखी या गावांमध्ये 250 कुटुंबांना अन्नधान्याचे पॅकेज देण्यात आले. यामध्ये तीन किलो तांदूळ, 3 किलो डाळ, 1 किलो साखर, 1किलो पोहे, 1 किलो शेंगदाणे, 1 लिटर तेल, 2 साबण इतर जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.

कोमल सुर्वे, समृद्धी सुतार, आत्माजा रणपिसे, सत्यम सुतार, सुमित्र सुतार, साई बोडके, मानसी दहिभाते, दिव्या मांगलिया, काव्य मांगलिया, रुद्रांश रणपिसे, आस्था चक्रनारायण, संस्कृती चक्रनारायण, शिवज्ञा आदर्श, आदित्य समर्थ रानवडे तसेच सुतारवाडी मधील शालेय विद्यार्थ्यांनी  पूरग्रस्त नागरिकांच्या साठी जमा करण्यात आलेले साहित्य पॅकिंग तसेच संकलन करण्यास सहाय्य केले.

सुतारवाडी मराठा सहाय्यक संस्थेच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांना प्रत्यक्ष जागेवरती जाऊन स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचवले. यावेळी आवश्यक ठिकाणी साहित्य मदत केल्याबद्दल पूरग्रस्त गावातील नागरिकांनी सुतारवाडी ग्रामस्थ व नागरिकांचे आभार व्यक्त केले.

See also  भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनमध्ये राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा