बाणेर :दिवाळी पाडवा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, रायकर फार्म, बाणेर येथे तब्बल ६१० किलो वजनाचा मोतीचूर लाडू तयार करून एक अनोखा विश्वविक्रम रचण्यात आला आहे.
हा विशाल लाडू तयार करण्यासाठी १५० किलो बेसन, ३०० किलो साखर, आणि १५० किलो तूप यांचा वापर करण्यात आला. हा लाडू “सर्वात मोठा वाढदिवसाचा लाडू” म्हणून Winners Book of World Records मध्ये अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे.या लाडूचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी Winners Book of World Records चे चेअरमन अभिनेत्री मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल यांनी या विश्वविक्रमाची घोषणा केली.
कार्यक्रमादरम्यान विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र १८४ विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय बी.के. डॉ. दीपक हरके, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बाणेर सेवाकेंद्राच्या संचालिका बी.के. डॉ. त्रिवेणी,आणि समृद्धी केटरर्स चे संचालक जालिंदर वाळके पाटीलयांना मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा उपक्रम अमित शाह यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून, समाजात प्रेम, ऐक्य आणि स्नेहाचा संदेश देणारा ठरला. सदर 610 किलो लाडूचे वितरण चार अनाथ आश्रमात वितरीत करण्यात आला.