पुणे : संडे हायकर्स परिवार प्रत्येक वेळी गड किल्ले आणि टेकडी सर करण्यासोबत वेगवेगळ्या संकल्पनेतून सणवार साजरा करत असतो. या वर्षीही ही परंपरा परिवाराने जपली. वेताळ टेकडीवर हजारो दिवे लावण्यात आलेआणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात संपूर्ण टेकडी परिसर दुमदुमून गेला. या दिव्यांच्या प्रकाशाने टेकडी परीसर उजळून निघाला.
वेताळ टेकडीवर वर दीपोत्सव करणं केवळ दिव्यांचा उत्सव नव्हता, तर तो संकल्पनेचा उजाळा होता.या उपक्रमाचा उद्देश केवळ सण साजरा करणे नव्हता, तर लोकांमध्ये दिवाळी विषयी प्रेम निर्माण करणे, तरुण पिढीला आपल्या परंपरेची ओळख करून देणे आणि शिकवण देणे होता.
संडे हायकर्स परिवाराने दीपोत्सव साजरा करून एक वेगळाच आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या या कार्यातून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि आपल्या परंपरेचे जतन करण्यासाठी पुढे यावे हीच दिपावलीच्या सणाच्या निमित्ताने अपेक्षा करतो.