बाणेर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने पुणे शहर आयोजित भगवा सप्ताह व काकड आरती निमित्ताने वॉर्ड क्रं. ०९ सुस बाणेर बालेवाडी मध्ये सर्व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पखवाद वाटप करण्यात आले.
युवासेना उपशहर प्रमुख श्री मयुर भांडे, सरपंच महाळुंगे यांच्या कडुन श्री विठ्ठल रुखमिणी मंदिर महाळुंगे पाडाळे, श्री विठ्ठल रुखमिणी मंदिर सुस, श्री विठ्ठल रुखमिणी मंदिर पाषाण, श्री विठ्ठल रूखमिणी मंदिर सुतारवाडी गावठाण, श्री विठ्ठल रुखमिणी मंदिर रणपिसे सुतारवाडी, श्री विठ्ठल रूखमिणी मंदिर सोमेश्वरवाडी, श्री विठ्ठल रुखमिणी मंदिर बाणेर, श्री विठ्ठल रुखमिणी मंदिर बालेवाडी येथे पखवाद देण्यात आले. यावेळी केंद्रीय धर्मसभा अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ ह.भ.प श्री. भाऊमहाराज फुरसुंगीकर ,शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक श्री. बाळासाहेब भांडे, श्री. ह.भ.प पांडुरंग आपा दातार, श्री. ह.भ.प शांताराम निम्हण महाराज यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी शिवसेना पदाधिकारी व सांप्रदाय मधील सर्व ह.भ.प मंडळी उपस्थित होते. या वाटप कार्यक्रमाचे नियोजन श्री. ह.भ.प अक्षयम हाराज पाडाळे यांनी केले होते.
























