बाणेर-बालेवाडी-पाषाण परिसरात ज्येष्ठ नागरीक व हास्य क्लबच्या सभासदांशी  मुरलीधर मोहोळ यांचा संवाद व भेट

बाणेर : पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार  मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी  नवचैतन्य हास्य योग क्लब पाषाण टेकडी, मुरकुटे उद्यान व स्मार्ट सिटी गार्डन बालेवाडी फाटा येथील हास्य क्लबचे सभासद व ज्येष्ठ नागरीकांशी प्रत्यक्ष भेटुन संवाद साधला.


यावेळी चर्चा करताना मुरलीधर मोहोळ  यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याकरीता मतदाररुपी साथ देण्याचे आवाहन केले. 
यावेळीबाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी-सुस-म्हाळुंगे भागातील सर्व महायुतीचे सर्व मा.नगरसेवक, नेते, सभासद, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ उभारणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे