शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धनकवडी शाखेचा वर्धापन दिन साजरा

धनकवडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या धनकवडी शाखेचा ३१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नागरिकांना पेढे वाटण्यात आले.

यावेळी उपजिल्हाप्रमुख रवींद्र मुजुमले , तालुकाप्रमुख तानाजी पवळे, सचिन पासलकर , भरत कुंभारकर , युवराज पारीख , नेहा कुलकर्णी,मृण्मयी लिमये,दीपक जगताप , अनिल भोसले , अनिल बटाने , सागर बारणे , दीपक जाधव , रमेश शेलार , नंदू जांभळे , नंदू घाटे, योगेश दासावडकर , अमित माने , राजू गवळी,अक्षय कदम ,निलेश पाटील, राजेंद्र बर्गे, पवार काका,राजेंद्र जुन्नरकर, भैसाडे काका, कुर्लेकर काका , सपकाळ , अमोल पवार आदी मान्यवर उपस्थित होते . ३१ वर्षात शाखेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा सर्व वक्त्यांनी गौरव केला .यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल देशमुख यांनी , तर आभारप्रदर्शन अतुल जाधव ,गणेश लांडे यांनी केले , कार्यक्रमाचे आयोजन योगेश पवार,निरंजन कुलकर्णी यांनी केले .या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

See also  स्विगी डिलिव्हरी बॉयच्या टोळक्याकडून सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण.