माॅडर्न महाविद्यालय गणेशखिंड मध्ये वाणिज्य विभागातर्फे फ्युचर बॅकर्स फोरमने ” गृहलक्ष्मी : आर्थिक व्यवस्थापनाची गुरूकिल्ली”कार्यक्रम संपन्न

पुणे : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात स्त्री शक्तिला वंदन करण्यासाठी वाणिज्य विभागातर्फे फ्युचर बॅकर्स फोरमने ” गृहलक्ष्मी : आर्थिक व्यवस्थापनाची गुरूकिल्ली” हा कार्यक्रम घेण्यात आला.


या मध्ये महिलांना आर्थिक साक्षरता किती महत्वाची आहे आणि यासाठी शासन बँकेमार्फत ज्या वेगवेगळ्या महत्वाच्या योजना राबवत आहे त्या विषयी श्री सदानंद दिक्षित, माजी सी ई ओ,प्रशिक्षक, पुणे पीपल्स को आँपरेटिव्ह बँक यांनी मार्गदर्शन केले. गुंतवणुक कुठे करावी व कुठे करु नये, उत्पन्नाचे मार्ग वाढविणे किती गरजेचे आहे, लहानपणापासून बचतीचे संस्कार मुलांवर कसे करावेत हे त्यांनी सांगितले.या वेळी बँक आँफ महाराष्ट्र च्या चतृ:श्रृंगी च्या ब्रँच मॅनेजर मा अनुजा उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला 56 विद्यार्थिनींच्या आई उपस्थित होत्या. नवरात्रात बँकेत काम केलेल्या “आदिशक्ती” च्या मुलांचा व अविष्कार या संशोधन स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाचे डाॅ पल्लवी निखारे यांनी सुत्रसंचलन केले.अँडव्होकेट अदिती पिंपळे यांनी मदत केली तर डाॅ मंजुषा कुलकर्णी यांनी समन्वय केला. या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा प्रा विजयालक्ष्मी कुलकर्णी, एफबीएफ प्रमुख यांनी केली.उपप्राचार्य डाॅ शुभांगी जोशी,डाॅ ज्योती गगनग्रास या उपस्थित होत्या.
प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी मार्गदर्शन केले.प्रा सुरेश तोडकर,सहकार्यवाह व डाॅ प्रकाश दिक्षित उपकार्यवाह यांनी अभिनंदन केले.

See also  शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग - चंद्रकांत दादा पाटिल