बाणेर : बावधन पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पासाळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघ कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांनी भेट घेऊन बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे आणि परिसरातल्या ट्रॅफिक समस्येविषयी चर्चा केली.
या अनुषंगाने मोहन नगर बिटवाईज रोड या ठिकाणी P1/P2 पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, तसेच महामार्ग व सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत निवेदन देण्यात आले.
सुसगाव परिसरातील व्युबगेर स्कूल पासून सनीवर्ल्ड कडे जाणारा रस्ता सुसगावच्या मुख्य रस्त्याला जोडण्याबाबत तसेच हिंजवडीकडे महाळुंग्यातून जाणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात यावी जेणेकरून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत होईल व मुख्य रस्त्यावरील ताण कमी होईल. याबाबत वाहतूक पोलिसांकडून देखील पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी करण्यात यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली.