हिंदू देवतांच्या डीपफेक, अश्लील प्रतिमा आणि साईट्सपसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी

नवी दिल्ली/पुणे: हिंदू देव-देवतांचे एआय-आधारित डीपफेक आणि अश्लील स्वरूपातील चित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. ही गोष्ट अतिशय संतापजनक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे जाणीवपूर्वक अशा गोष्टी पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली.

खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी विशेष उल्लेखाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि मनस्ताप देणारे असल्याचे सांगत त्यांनी यामागे जाणीवपूर्वक धार्मिक भावना भडकवण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू असल्याचा आरोप केला.प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, अलीकडच्या काही महिन्यांत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सवर एआय-जनरेटेड, मॉर्फ्ड आणि डीपफेक अश्लील चित्रांचा मोठा प्रसार होताना दिसून येत आहे. हिंदू देवतांचे चित्रण खास करून लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रगत एआय-तंत्रज्ञान, डीपफेक टूल्स आणि इमेज मॅनिप्युलेशनच्या दुरुपयोगामुळे सायबर गुन्ह्याचा नवा धोका निर्माण झाला असून, पवित्र प्रतिमा विकृत करून मुक्तपणे प्रसारित केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, अलीकडच्या काही महिन्यांत अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट्सवर एआय-जनरेटेड, मॉर्फ्ड आणि डीपफेक अश्लील चित्रांचा मोठा प्रसार होताना दिसून येत आहे. हिंदू देवतांचे चित्रण खास करून लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रगत एआय-तंत्रज्ञान, डीपफेक टूल्स आणि इमेज मॅनिप्युलेशनच्या दुरुपयोगामुळे सायबर गुन्ह्याचा नवा धोका निर्माण झाला असून, पवित्र प्रतिमा विकृत करून मुक्तपणे प्रसारित केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.सध्याच्या कायदेशीर चौकटीत या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी कडक व्यवस्था नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. या कृत्यांच्या पद्धतशीर आणि हेतुपुरस्सर स्वरूपावरून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.

सध्याच्या कायदेशीर चौकटीत या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी कडक व्यवस्था नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. या कृत्यांच्या पद्धतशीर आणि हेतुपुरस्सर स्वरूपावरून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले.केंद्र सरकारने या प्रकारातील दोषींवर कठोर आणि आदर्श कारवाई करावी, सोशल मीडिया कंपन्यांना एआय-आधारित शोधयंत्रणा, तत्काळ ‘टेकडाऊन’ प्रणाली आणि संवेदनशील सामग्रीसाठी कठोर पडताळणी प्रक्रिया अनिवार्य कराव्यात, अशी मागणी केली. यासोबतच, ‘हिंदू फेथ प्रोटेक्शन लॉ’ किंवा ‘अँटी-ब्लास्फेमी लॉ’ सारखा सर्वंकष कायदा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, ज्याद्वारे एआय-आधारित धार्मिक बदनामी थांबवता येईल.

See also  पुणे महानगरपालिकेने पाणीबचतीच्या उपाययोजना कराव्यात-अजित पवार

केंद्र सरकारने या प्रकारातील दोषींवर कठोर आणि आदर्श कारवाई करावी, सोशल मीडिया कंपन्यांना एआय-आधारित शोधयंत्रणा, तत्काळ ‘टेकडाऊन’ प्रणाली आणि संवेदनशील सामग्रीसाठी कठोर पडताळणी प्रक्रिया अनिवार्य कराव्यात, अशी मागणी केली. यासोबतच, ‘हिंदू फेथ प्रोटेक्शन लॉ’ किंवा ‘अँटी-ब्लास्फेमी लॉ’ सारखा सर्वंकष कायदा करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली, ज्याद्वारे एआय-आधारित धार्मिक बदनामी थांबवता येईल.