पुणे महापालिकेचे सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक सादर

पुणे : Pune Municipal Corporation पुणे महानगरपालिकेचे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आज महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्याकडे सादर केले.

महापालिकेच्या मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी महापौर मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) पृथ्वीराज बी. पी., सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर तसेच नगरसचिव योगिता भोसले-निकम यांचीही उपस्थिती होती.

अंदाजपत्रक सादरीकरणाच्या वेळी महापालिकेचे इतर सभासद, अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अंदाजपत्रकात आगामी वर्षातील विकासकामे, पायाभूत सुविधा, नागरिक सेवा तसेच विविध प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन मांडण्यात आले आहे. अंदाजपत्रकावर पुढील काळात स्थायी समिती आणि महापालिका सभागृहात चर्चा होऊन अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.

See also  परदेश शिष्यवृत्ती योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन