बाणेर : “मी” च्या ऐवजी “आम्ही” ला प्राधान्य दिल्यास संस्थेची प्रगती होते याचेच उत्तम उदाहरण म्हणजे योगीराज पतसंस्था असे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी
योगीराज पतसंस्थेच्या 27 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने केले.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने वडिलांचे अपघाती निधन झालेल्या व मावशीने सांभाळ केलेल्या दुर्गा अंभोरे या गरीब मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण भांड्यांचा संसार पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे यांच्या हस्ते भेट देण्यात आला. शुटिंग (पिस्तूल) मध्ये नैपुण्य मिळविलेल्या देवश्री जगडे हिला 15 हजार रुपयांची मदत केली. संस्थेच्या स्टाफला प्रत्येकी 20 हजार प्रमाणे 5 लाख रुपये शैक्षणिक अनुदान देण्यात आले. तसेच पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांची महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सर कार्यवाह पदी निवड झाल्याबद्दल, अॅड. पांडुरंग थोरवे यांची जेजुरी येथील मार्तंड देवस्थानचे विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल व डॉ. राजेश देशपांडे यांना रोटरी क्लब चा सेरा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने बी. व्ही. जी. ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संस्थेचे सभासद घाडगे यांना 10 लाख कर्ज वितरित केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी सांगितले की संस्थेच्या दोन शाखा असून ठेवी 112 कोटी, कर्ज 90 कोटी, व्यवसाय 200 कोटीच्या पुढे झाला आहे तर निव्वळ नफा 2 कोटी 70 लाख रुपये झाला आहे. आर्थिक प्रगती बरोबरच संस्था सामाजिक बांधिलकी च्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असते. तसेच वर्धापन दिनानिमित्त संस्थेत आज 70 लाख रुपयांची ठेव आली.
याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, माजी उपमहापौर शंकरराव निम्हण, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, परभणी च्या माजी महापौर संगीता वडकर, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, शिवाजी बांगर, योगीराज देवकर, माजी शिक्षण अधिकारी विष्णु जाधव, अशोक मुरकुटे, पूनम विधाते, राहुल बालवडकर, दिलीप मुरकुटे, नारायण चांदेरे, गणपत बालवडकर, दिलीप फलटणकर, संग्राम मुरकुटे, जिवन चाकणकर, नितीन रनवरे, रोहित कासट, श्रीकांत जाधव, दत्तात्रय तापकीर, सुधाकर धनकुडे, श्रीकांत पाटील, चंद्रभागा भिसे, चंद्रलेखा बेलसरे, नानासाहेब ससार, अजय निम्हण, विविध बँकांचे प्रतिनिधी, संस्थेचे उपाध्यक्ष राजेश विधाते, शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, संचालक संजय बालवडकर, संचालिका अलका सिरसगे, माजी संचालक अशोक रानवडे, वसंत माळी, अमर लोंढे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके, भाग्यशाली पठारे, सर्व स्टाफ तसेच खातेदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तज्ञ संचालक रविंद्र घाटे यांनी केले तर सर्वांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे यांनी मानले.