नागपूर : प्रभाग क्रमांक 9 सुस बाणेर पाषाण मधील प्रलंबित प्रश्नांबाबत नागपूर येथे आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला कार्याध्यक्ष पुनम विधाते यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी विशाल विधाते, अक्षय विधाते, विक्रम विधाते आदी उपस्थित होते.यावेळी प्रभागातील गेले अनेक वर्ष प्रलंबित राहिलेले रस्त्याची अर्धवट कामे, पाणीपुरवठा, आरोग्य, क्रीडा व शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर लवकरात लवकर सकारात्मक उपाययोजना राबविण्यासाठी राज्य शासनाकडून सहकार्य व्हावे यासाठी मागणी करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी पुनम विधाते यांच्या कार्याचा आढावा घेतला व याबाबत चर्चा केली.आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वात परिसराचा विकास करताना पुणे महानगरपालिका व शासनाकडून आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी करण्यात आली याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याचे पुनम विधाते यांनी सांगितले.
























