प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये

औंध : प्रभाग क्रमांक ९ सुस बाणेर पाषाण मधील राजकीय नाट्यपूर्ण घडामोडीनंतर भाजपाचे चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरूड मतदार संघामध्ये आव्हान निर्माण करणारे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना भाजपाने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगाने बदलताना दिसत आहेत. औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयामध्ये असलेल्या प्रभाग क्रमांक आठ व नऊ मधील सर्वच माजी नगरसेवकांना भाजपाने उमेदवारी नाकारले असून या जागी नवे चेहरे देण्यात आले आहेत.

अमोल बालवडकर यांच्या जागी कोथरूड मतदारसंघ उत्तर अध्यक्ष लहू बालवडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतदान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार शंकर मांडेकर हे बाणेर बालेवाडी परिसरात तळ ठोकून बसले असल्याची राजकीय चर्चा सातत्याने होत होती. तसेच अमोल बालवडकर यांचे निकटवर्तीय पावणे आमदार कटके यांचा राष्ट्रवादी प्रवेशांमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे मानले जाते.

माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थिती अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे. तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा ही लढत जोरदार रंगणार असल्याचे चित्र सध्याच्या उमेदवारीमुळे पाहायला मिळत आहे.

See also  "यामाहा FZ-S FI Hybrid" बाईकचे शानदार लोकार्पण — राया मोटर्स, बाणेर, पुणे येथे अरुण पोद्दार -  सीईओ चॉइस इंटरनॅशनल यांच्या हस्ते उद्घाटन