कोथरूड : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक १० ब (भुसारी, बावधन) येथून सौ. रुपाली सचिन पवार (थरकुडे) यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे.
कोथरूड येथील हिंदुह्रृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहामध्ये पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी निवडणूक अधिकारीांकडे अर्ज सादर केला. यावेळी भाजपच्या स्थानिक नेतृत्वासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्ज दाखल करताना सौ. रुपाली पवार यांनी प्रभागातील पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिलांसाठी सुरक्षितता व नागरी सोयी-सुविधांच्या विकासावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजप सरकारच्या विकासकामांचा वारसा पुढे नेत भुसारी–बावधन परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रभागात प्रचाराला वेग आला आहे.























