सुस : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून सुस येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडली.
भगवती नगर येथून पदयात्रेला सुरुवात झाली. पारखे वस्ती, शिवबा चौक, बाल मित्र मंडळ, मुंजाबा चौक, वाढेश्वर मंदिर, पंचरत्न मंडळ असा मार्गक्रमण करत भैरवनाथ मंदिर येथे जाहीर सभेने पदयात्रेची सांगता करण्यात आली.
पदयात्रेच्या सुरुवातीपासूनच नागरिकांचा मोठा व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव, जोरदार घोषणाबाजी आणि जाहीर सभेत जनतेचा सक्रिय सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आतापर्यंत झालेल्या विकासकामांचे कौतुक केले तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा व्यक्त केला.या पदयात्रेत सुस गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत सहउमेदवार सौ. गायत्री मेढे–कोकाटे, सौ. पार्वती निम्हण, श्री. अमोल बालवडकर आणि श्री. बाबुराव चांदेरे हे उपस्थित होते.
जाहीर सभेत उपस्थित मान्यवरांनी येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून या चौघांनाही प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले. सुस परिसरातील विकास, पायाभूत सुविधा, नागरी समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षा यावर आधारित सकारात्मक संवाद या पदयात्रेच्या माध्यमातून साधण्यात आल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
























