प्रभाग ९ मधील अपक्ष उमेदवार किरण रायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पुणे : प्रभाग क्रमांक ९ ब मधील अपक्ष उमेदवार किरण लक्ष्मण रायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रभागातील मतदार आणि मित्रपरिवाराच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून किरण रायकर यांना शुभेच्छा दिल्या.

किरण लक्ष्मण रायकर हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांनी लोकांच्या दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. लॉन्ड्री व्यवसायातून सामाजिक संपर्क वाढवत आलेले किरण रायकर यांना निवडणूक आयोगाकडून ‘इस्त्री’ हे चिन्ह देण्यात आले आहे.

जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शंकर ननावरे, किशोर फणसे, विजय ननावरे, प्रशांत ननावरे, प्रशांत शिंदे, ओमप्रकाश मुंदडा, जयंत जगताप, ओमप्रकाश मंत्री, अजय झाडूकर, संजय पाटील, सतीश कलंत्री, किशोर रायकर, प्रदीप बर्डे, साहेब सागर पवार, सागर सकळकर, अभिनंदन जगताप, मोनू पठाण, मंजुळाताई ननावरे, सोनाली ननावरे, प्रतिभा जाधव, सुप्रिया ननावरे, प्रज्ञा कांबळे, सुलोचना शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी किरण रायकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत, प्रभागाच्या विकासासाठी अपक्ष नेतृत्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांशी थेट संवाद, पारदर्शक कारभार आणि स्थानिक प्रश्नांचे तातडीने निराकरण हे आपल्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असल्याचे किरण रायकर यांनी सांगितले.

See also  बाणेरमध्ये काँग्रेसचा झंझावाती प्रचार दौरा; वृषाली चाकणकर यांच्या घरोघरी संवादातून काँग्रेस पक्षाच्या विकास कामांची आठवण