पाषाण | पुणे बुलेटीन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार मयूर सुतार यांनी सुतारवाडी–पाषाण परिसरात नागरिकांच्या गाठीभेटी घेत जोरदार प्रचार केला. या प्रचारादरम्यान त्यांनी परिसरातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
पाषाण परिसरात ह.भ.प. शांताराम महाराज निम्हण यांचे आशीर्वाद घेत मयूर सुतार यांनी प्रचाराला सुरुवात केली. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक व शैक्षणिक प्रश्न यावर त्यांनी विशेष भर दिला.
सुतारवाडी परिसरातील स्थानिक महिलांनी यावेळी मयूर सुतार यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘स्कूल बसवाले काका’ यांच्या प्रचारात सहभाग घेत विविध सोसायट्यांमध्ये मयूर सुतार यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले आहे.
























