नियोजनबद्ध प्रचार आणि मतदारांचा विश्वास यामुळे प्रभाग 29 मध्ये कमळ फुलणार – सौ. मंजुश्री खर्डेकर यांचा दावा

कोथरूड  : प्रभाग क्रमांक 29 डेक्कन जिमखाना हॅपी कॉलनी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध रीतीने प्रचार यंत्रणा राबविली असून या भागातील नागरिकांचा भारतीय जनता पार्टीवर असलेल्या विश्वासामुळे प्रभागातील चार ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा दावा ह्या प्रभागातील उमेदवार मंजुश्री संदीप खर्डेकर यांनी केला आहे. 2017 ते 2022 या कालावधीत मी या भागाची नगरसेविका म्हणून केलेले कार्य आणि त्यानंतर देखील गत तीन वर्षात सातत्याने कार्यरत राहिल्यामुळे आणि नागरी समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहिल्याने या भागातील नागरिकांचा विश्वास संपादन केला असून 2017 पेक्षा देखील जास्त मताधिक्याने निवडून येऊ असेही त्या म्हणाल्या.

उमेदवार 29 (अ ) मधून सुनील पांडे, 29 (ब ) मधून ऍड. मिताली सावळेकर, 29 ( क )  मंजुश्री खर्डेकरआणि 29 ( ड ) मधून पुनीत जोशी असे सक्षम पॅनल या ठिकाणी असून माझे तिन्ही सहकारी हे दीर्घकाळ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून समाजकार्यात अग्रेसर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास आणि सबका विश्वास ह्या घोषणेनुसार आणि महाराष्ट्राचे विकास पुरुष देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा आणि पुण्याच्या विकासाचा जो रोडमॅप जनतेसमोर ठेवला आहे त्याचेच अनुकरण आम्ही आमच्या प्रभागात करणार आहोत व त्यामुळेच आम्हाला नागरिकांची भरभरून साथ लाभते असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

ना. मुरलीधरअण्णा मोहोळ यांची गोसावी वस्तीतील रॅली, ना. चंद्रकांतदादा पाटील यांची वसंतनगर भीमनगर आरु चाळ या भागातील फेरीने वातावरण ढवळून निघाले असून आम्ही निश्चितच विजय मिळवू असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.काल रविवारचा मुहूर्त साधत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काढलेली भव्य दुचाकी रॅली, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचा घर टू घर प्रचार, विविध सोसायटीत व वस्त्यांमध्ये बैठका यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आम्ही आमच्या कार्याच्या जोरावर निश्चित विजयी होऊ असा विश्वास ही मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.

See also  महेश काळेंचा स्वरसाज,लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे 'सुर संध्या'ने बहरली दिवाळी

या प्रभागातील नागरिकांसाठी वचननामा तयार केला असून त्यानुसार काम करण्याची ग्वाही दिली असल्याचेही मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
वचननामा… निवडून आल्यास नागरिकांसाठी 24×7 उपलब्ध राहीन याची ग्वाही देते. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मोठे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहतानाच अतिक्रमण व फ्लेक्स मुक्त प्रभाग,डुक्करांच्या त्रासापासून मुक्तता, भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार त्यांना खाऊ घालण्याची ठिकाणे निश्चित करेन व आक्रमक श्वानांना मनपाच्या केंद्रात पाठविण्यासाठी कटिबद्ध राहीन.पुरेश्या दाबाने पाणीपुरवठा, कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा, खड्डेमुक्त रस्ते अश्या विविध दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहीन. यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, लहान मुलांमध्ये स्क्रीन टाईम कमी करण्याविषयीचे उपक्रम आणि भौतिक सुविधा उपलब्ध करताना मानसिक शांतीसाठीचे व आरोग्य संपन्नते साठी चे उपक्रम राबविण्यावर भर देईन. नागरिकांच्या सुरक्षितते वर भर देतानाच वाढत्या सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृतीवर भर देईन.
वस्ती विभागात एस आर ए प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्नशील राहतानाच तेथील महिला व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
प्रभागातील डी पी रस्ता “म्हात्रे पुल ते राजाराम पुल” दरम्यान ची अपूर्ण कामं पूर्ण करणे,वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे,पं. जितेंद्र अभिषेकी उद्यानाबाबत दोन्ही पक्षांमध्ये सन्माननीय तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे व हे उद्यान नागरिकांसाठी उपलब्ध करणे यावर भर देईन.
तसेच इमारतींच्या किंवा बंगल्यांच्या पुनर्वसन प्रकल्पांचा प्रभागाच्या infra structure वर ताण येऊ नये यासाठी प्रशासनासोबत समन्वय राखून विद्यमान सुविधा मध्ये वाढ करण्यासाठी वचनबद्ध राहीन.
यासह वैयक्तिक जनसंपर्कावर भर देताना एक कुटुंब म्हणून प्रभागातील नागरिकांच्या सुख दुःखात माझा सहभाग असेल !!
या व्यतिरिक्त प्रभागातील नागरिक ज्या सूचना करतील त्या प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी प्रयत्नशील राहीनच…. असेही मंजुश्री संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले आहे.