कोथरूडमधील धोकादायक नाल्यांची इंडिया फ्रंट आघाडीच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी

कोथरूड : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर कोथरूड परिसरातील ओढे-नाले साफसफाई कामांची पाहणी आज इंडिया फ्रंट आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आली. प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व नाल्यांच्या साफसफाई कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.पाहणी दरम्यान कोथरूडमधील नालेसफाईची जवळपास ९०% कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले. काहीच दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना अपूर्ण कामांमुळे कोथरूडमध्ये पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याचे यावेळी जाणवले.

कोथरूड परिसरातील सागर कॉलनी, गणंजय सोसायटी, तेजसनगर, कोकण एक्स्प्रेस चौक, कर्वे रोड नाले, मृत्युंजयेश्वर मंदिर मागील नाला, प्रतिकनगर चौक, शिवतीर्थनगर चौक या सर्व नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. व सगळीकडेच नाल्याच्या पात्रातील साठलेला कचरा,गाळ, तुटलेले संरक्षक कठडे अशी धक्कादायक परिस्थिती निदर्शनास आली.

पुणे मनपा प्रशासनाने येत्या सात दिवसांत सदर कामे पूर्ण न केल्यास इंडिया फ्रंटच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन यावेळी महानगरपालिका प्रशासनास देण्यात आले. तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या जिवितास हानी झाली किंवा वित्तहानी झाली तर त्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व प्रशासनास जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी इंडिया फ्रंट आघाडीच्या वतीने करण्यात आली.

माजी आमदार चंद्रकांत मोकाटे मार्गदर्शनाखाली इंडिया फ्रंट आघाडी शिवसेना, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, व कॉंग्रेस या घटक पक्षाचे पदाधिकारी डॉ.अभिजित मोरे, मा.नगरसेवक अॅड.योगेश मोकाटे, अमोल मोरे,शिवाजी गाढवे, विजय खळदकर, प्रदीप उदागे, विशाल कचरे, रोहन रोकडे, ज्योतीताई सूर्यवंशी, श्रीनिवास भांबुरे, आरती करंजावणे, मनीषा भोसले, प्रा.बाबासाहेब जाधव, अॅड.दत्तात्रय भांगे, राजू गोखले, किशोर मारणे तसेच यावेळी स्थानिक रहिवासी नागरिक उपस्थित होते.

See also  बाजीराव पेशवे पुतळ्याची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहाणी