शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जयदीप पडवळ यांच्यावतीने १मे महाराष्ट्र दिनानिमित्त  महिलांसाठी लावण्या व आरोग्य शिबिराचे आयोजन

कोथरूड : कोथरूड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 1 मे महाराष्ट्र/कामगार दिनानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मोफत नेत्रचिकित्सा शिबीर, मोफत चष्मे वाटप , मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमाचे गुरुवार , दिनांक 01/05/2025 रोजी , वेळ – सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, शिवसेना शाखा पौड रोड, आयडियल कॉलनी, ओगले चौक, कोथरूड आयोजन करण्यात आल्या असून सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तर शुक्रवार दिनांक २ मे रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे महिलांसाठी सदाबहार मराठी लावण्यांचा कार्यक्रम आणि भव्य लकी ड्रॉ सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन माजी सभासद पुणे मनपा वृक्ष प्राधिकरण समिती जयदीप पडवळ मित्रपरिवार, शिव साई संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन  श्री. मारूती वर्वे , श्री. नवनाथ भगत , श्री. दिपक दिघे, श्री. प्रकाश दिघे, अक्षय वर्वे,
श्री. सुनील वाघ, श्री. प्रकाश सातपुते यांनी केले आहे.

See also  आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा,भारत निवडणूक आयोगाने विकसित केला मोबाईल ॲप