पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (सुस, बाणेर, पाषाण) येथील शिवसेना पक्षाचे उमेदवार मयूर भांडे यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सुस, बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, महाळुंगे आणि सोमेश्वरवाडी परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधला.
या पदयात्रेदरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात शक्तीप्रदर्शन करत प्रभागातील विविध भागांत प्रचार केला. नागरिकांच्या दैनंदिन समस्या, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक व स्वच्छतेसह विविध नागरी प्रश्नांवर मयूर भांडे यांनी नागरिकांशी सविस्तर चर्चा करत त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मयूर भांडे यांनी महाळुंगे गावाचे सरपंच असताना केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना देत अनुभवाच्या आधारे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या प्रचार पदयात्रेत बाणेर, बालेवाडी, सुस, महाळुंगे, सुतारवाडी, पाषाण आणि सोमेश्वरवाडी परिसरातील शिवसैनिक तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रचारादरम्यान संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
























