औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील मोहल्ला कमिटीच्या बैठकीला पाणीपुरवठा अधिकारी गायब; नागरिकांची पाणीपुरवठा विभागाची बैठक लावण्याची मागणी

बाणेर : बाणेर औंध क्षेत्रीय कार्यालयातील मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये बाणेर बालेवाडी औंध पाषाण सुतारवाडी परिसरातील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरले परंतु मोहल्ला कमिटीच्या बैठकीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि प्रश्न गंभीर असताना अनुपस्थित का राहिले याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले? व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाची मुख्य अभियंता यांच्या उपस्थितीत क्षत्रिय कार्यालयात बैठक लावण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर तसेच क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी औंध परिसरातील अतिक्रमणे, बाणेर बालेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे, राजकीय दबावातून तयार करण्यात आलेले रस्ते, कचरा समस्या तसेच सुतारवाडी स्विमिंग पूल व औंध स्विमिंग पूल ची दुरुस्ती याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या बैठकीमध्ये नाना वाळके यांनी औंध बोपोडी येथील नागरिकांचे विविध प्रश्न उपस्थित केले. तर रमेश ठोसर यांनी औंध परिसरातील वाढती गुन्हेगारी तसेच ईडब्ल्यूएस इमारतींचा गुन्हेगारीसाठी होत असलेला वापर याबाबत प्रश्न उपस्थित केले.‌ कल्याणी टोकेकर यांनी बाणेर परिसरातील ड्रेनेज लाईन, कचऱ्याचा प्रश्न तसेच रस्त्यातील खड्डे याबाबत प्रश्न मांडले. निलेश जुनवणे यांनी औंध परिसरातील पाण्याचा प्रश्न तसेच ड्रेनेज लाईन वरील झाकणांची होत असलेली चोरी याबाबत प्रश्न उपस्थित केले. महेश सुतार यांनी सुतारवाडी मधील पाणी प्रश्न, कचरा समस्या व रस्त्यातील खड्डे याबाबत समस्या मांडल्या. तर सोमेश्वरवाडी येथील पाणी प्रश्न भरत जोरे यांनी उपस्थित केला.

बाणेर परिसरामध्ये टेंडर न काढता होत असलेली रस्त्यांची कामे ही गंभीर बाब यावेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली व कारवाईची मागणी करण्यात आली.

See also  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंडांचे प्रकाशन