पुणे शहरात साकारणार संविधान उद्यान उपमहापौर परशुराम वाडेकरांच्या संकल्पनेला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पुणे  :  सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या भारतीय संविधानाच्या संकल्पनेवर आधारित उद्यान महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने साकारण्यात येणार आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या या संकल्पनेला महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संभाजी उद्यान येथे आयोजित करण्यात आलेल्या फुले, फळे आणि भाज्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सभागृह नेते गणेश बीडकर, मनपा आयुक्त नवल किशोर राम , अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे,  अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज , बनकर, उद्यान विभागाचे घोरपडे  आदि मान्यवर उपस्थित होते. 

संपूर्ण देशाचा कारभार सुरळीतपणे चालविणाऱ्या संविधानाची सर्व नागरिकांना, विशेषतः देशाचे भवितव्य असलेल्या विद्यार्थी वर्गाला ओळख व्हावी, संविधानाची मूल्य, संविधानाला नागरिकांकडून असलेल्या अपेक्षा, कर्तव्य आणि अधिकार याची माहिती व्हावी, या दृष्टीने या उद्यानाची उभारणी केली जाणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवक या प्रस्तावाला मान्यता देतील व या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही देखील वाडेकर यांनी दिली.

याच कार्यक्रमात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी  संविधान उद्यान उभारण्यासाठी दोन दिवसात उद्यान विभागाचे प्रमुख घोरपडे यांच्यासह पाहणी करून जागा निश्चित करण्यात येईल, अशी घोषणा देखील केली आहे.

See also  आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी ! लहू बालवडकर सोशल वेल्फेअरचा उपक्रम