गिरजाबाई पाटील शाळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन

धानोरी : सिद्धार्थ शिक्षण संस्था संचालित, मातोश्री गिरीजाबाई पाटील प्राथमिक शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय, भैरव नगर, धानोरी, पुणे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. विद्या पाटील होत्या व प्रमुख पाहुणे सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मारुती पाटील, प्रास्ताविक सौ. तृप्ती कांबळे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उजाळा श्री. विजय श्रीवास्तव यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून झाली व नंतर बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळी शाळेतील श्री. विजय श्रीवास्तव, श्री. योगेश बिंदगे, श्री. मारुती पाटील, श्री. विशाल वाघमारे, श्री. अंबादास कांबळे, श्री. गौतम बोरकडे, श्री. मुकेश विधाते, सौ. मनीषा चिंचणे, सौ. अनामिका कुलकर्णी, सौ. शुभांगी काळगुडे, सौ. तृप्ती कांबळे, सौ. प्रिया शेलार, सौ. ममता चौधरी, सौ. रुपाली पवार, सौ. तेजस्विनी देशमुख, सौ. रमाताई डंबारे, सौ. मानसी पलांडे, सौ. शीतल गायकवाड, सौ. अर्चना बनछोड, सौ. सविता इमडे, सौ. ज्योती एडके, सौ. सुरेखा टाकळे, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचा विचार फक्त लिहिला नाही तर तो विचार ते जन्मभर जगले. ते खऱ्या अर्थाने कर्ते सुधारक होते. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी सहजपणे समानतेचे धडे दिले, असे विद्यार्थ्यांना संबोधून संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक पाटील सर बोलत होते.

See also  बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा-डॉ.नीलम गोऱ्हे