महापालिका बैठकीत किरीट सोमय्या केंद्रस्थानी? प्रशासनाचा अवमान झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

पुणे : पुणे महानगरपालिकेतील एका बैठकीत महापौरांना केंद्रस्थानी स्थान न देता किरीट सोमय्या यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी या प्रकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सुनील माने यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेच्या अधिकृत बैठकीत प्रोटोकॉलनुसार महापौर हे केंद्रस्थानी असणे अपेक्षित असते, तर आयुक्त हे त्यांच्या शेजारी असतात. मात्र संबंधित बैठकीत हा प्रोटोकॉल मोडून किरीट सोमय्या यांना मध्यवर्ती स्थान देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाचा आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा अवमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
माने यांनी सवाल उपस्थित करत विचारले की, किरीट सोमय्या यांची सरकारने कोणत्या आदेशाद्वारे विशेष नियुक्ती केली आहे का? तसे असेल तर तो आदेश सार्वजनिक करावा. अन्यथा प्रशासनाने अशा पद्धतीने प्रोटोकॉल मोडणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.

तसेच, आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनाही या घटनेवर मौन का बाळगून आहेत, असा सवाल करत प्रशासनाची अशी अवहेलना यापूर्वी कधी झालेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
या प्रकरणामुळे महापालिकेतील प्रोटोकॉल आणि प्रशासनाच्या स्वायत्ततेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

See also  तुंबलेली ड्रेनेज लाईनचे मैलापाणी मंदिरामध्ये, तातडीने कारवाई करा हिंदू दैवतांचा अपमान सहन करणार नाही मनसेचा आंदोलनचा इशारा