डॉक्टर संपदा मुंडे यांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा तसेच महिला आयोग अध्यक्ष पदाचा रूपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा यासाठी गुडलक चौकात सामाजिक संघटनांचे आंदोलन

पुणे  : गुडलक चौकात कलाकार कट्टा येथे डॉ संपदा मुंडे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी  तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यानी डॉ. संपदा मुंडे यांच्या
मृत्यूनंतर त्याच्याबाबत आक्षेपार्ह विधान करुन केले तसेच  खालच्या पातळीवर जाऊन विधान केली तिच्या चारित्र्यवर शिंतोडे  उडवण्याचे काम केले त्याच्या  निषेधार्थ  रूपाली चाकणकर यांनी त्वरीत  राजीनामा  द्यावा यासाठी आंदोलन करण्यात आले.


बिटिया  फाउंडेशन , गुलाबो गँग आणि झाशीची राणी प्रतिष्ठान ह्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे संगीता तिवारी, रूपाली पाटील, स्वाती ढमाले ह्यांच्या नेतृत्वा खाली कलाकार कट्टा गुडलक चौकात  हे आंदोलन  करण्यात आले. ह्या आंदोलना चे नेतृत्व बिटिया फाउंडेशन आणि काँग्रेस च्या संगीता तिवारी, झाशीची राणी प्रतिष्ठान च्या रूपाली पाटील, शिवसेनेच्या स्वाती ढमाले ह्यांचनी केले. ह्यावेळी  मनीषा कावेडिया, सोनिया ओव्हाळ. संगीता भालेराव, डिंपल इंगळे, वंदना साळवे, निसु कोटा, पूनम गुंजाळ, नीलम फाये ह्या उपस्थित होत्या.

राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि बेताल वक्तव्य केले. या विरोधात पुण्यातील महिला एकत्र आल्या. तसेच त्यांच्या राजीनाम्याची  मागणी केली,यावेळी रूपाली चाकणकर यांच्या  फोटोला लिपस्टिक लावून, आणि चिल्लर ची माळ घालून त्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले नंतर त्यांच्या फोटोला जाळण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी महिलांनी त्यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या आणि जर राजीनामा घेतला नाही तर येत्या काही दिवसात याही पेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल असे संगीता तिवारी यांनी सांगितले.

See also  वीज दरात सहा टक्के दरवाढ