औंधमध्ये श्री शिवाजी विद्यामंदिर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा 12 एप्रिलला

औंध : जनता शिक्षण संस्था संचालित श्री शिवाजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध येथील SSC 2002- 2003 व HSC बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहसंमेलन मेळावा रविवार, दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या वेळेत शाळेच्या प्रांगणात पार पडणार असून, या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि कर्मचारी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देणे, मित्र-मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणणे आणि शाळेशी असलेले नाते अधिक दृढ करणे हा आहे. कार्यक्रमात दीपप्रज्वलन, स्वागत समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, शिक्षकांचा सत्कार, माजी विद्यार्थ्यांचे अनुभव कथन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच या मेळाव्याद्वारे माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी योगदान देण्याचा उपक्रमही हाती घेतला असून, शाळेच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

आयोजक समितीने अल्पावधीतच मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यात यश मिळवले असून, सर्व समित्या समन्वयाने कार्यरत आहेत. त्यामुळे हा मेळावा अत्यंत उत्साहात आणि भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

“हा कार्यक्रम केवळ एक मेळावा नसून, जुन्या मैत्रीचा, आठवणींचा आणि शाळेशी असलेल्या भावनिक नात्याचा उत्सव आहे,” असे आयोजकांनी सांगितले.

सर्व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  माध्यम समन्वयक अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्यांप्रमाणे चोखपणे काम करावे- माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर