भाजपा स्थापना दिनानिमित्त पाषाण सुतारवाडी मध्ये स्वच्छता अभियान उत्साहात

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त कोथरूड उत्तर मंडल आणि नगरसेविका रोहिणी  चिमटे यांच्या पुढाकारातून प्रभागात स्वच्छता अभियान उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्वच्छता अभियानात औंध क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात आला.

या मोहिमेत प्रकाश बालवडकर, सचिन पाषाणकर, मोरेश्वर बालवडकर, वंदना  सिंग, आनंद जराड, राणी मोहिते, प्रियांका ताई पेंडसे यांच्यासह कोथरूड उत्तर मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एकत्रित प्रयत्नांतून स्वच्छ, सुंदर आणि जागरूक समाज निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

See also  नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेटइस्रोच्या 'स्पॅडेक्स PSLV-C60' यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक