पुणे, औंध (प्रतिनिधी): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त (१४ एप्रिल २०२६) औंध परिसरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास हृषिकेश गायकवाड, संतोष समिंदर, भीमा गायकवाड, माणिक कांबळे, दिपक कांबळे, योगेश भोसले, जीवन माने यांच्यासह आंबेडकर वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श समाजात रुजवण्याचा संकल्प व्यक्त केला.
























