पिंपरी : नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर अपॉइंटमेंट मिळावी तसेच सेवेमध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय (RPO) पुणे तर्फे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (POPSK) पिंपरी येथे दिनांक २० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान पासपोर्ट मोबाईल व्हॅन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना जलद व सुलभ पद्धतीने पासपोर्ट सेवा मिळणार असून, अपॉइंटमेंट मिळण्यातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे.
कागदपत्रांबाबत सूचना
ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी प्रौढ तसेच अल्पवयीन अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांची चेकलिस्ट काळजीपूर्वक तपासावी. अर्जदाराची सत्यता पडताळण्यासाठी पारपत्र कायदा १९६७ आणि नियम १९८० नुसार आवश्यक असल्यास अतिरिक्त कागदपत्रे मागवली जाऊ शकतात.
अपॉइंटमेंट कशी बुक कराल?
Passport Seva Portal या संकेतस्थळाला भेट द्या
सामान्य योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करा
ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर ‘अपॉइंटमेंट निश्चित करा’ या पर्यायावर क्लिक करा. ‘मोबाइल व्हॅन’ हे स्थान निवडून अपॉइंटमेंट बुक करा
सेवा केंद्राची माहिती दिनांक: २० एप्रिल ते ३० एप्रिल २०२६
ठिकाण: पिंपरी पोस्ट ऑफिस (हिंदुस्तान अँटीबायोटिक्स समोर, जुना पुणे-मुंबई महामार्ग, खराळवाडी)
वेळ: सकाळी ०८:३० ते सायंकाळी ०६:००
अर्जदारांनी त्यांच्या ऑनलाइन अपॉइंटमेंट वेळेच्या किमान १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
























