कोथरूड मतदार संघात शिवसेना पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

बाणेर : कोथरूड मतदार संघाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. बाणेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भांडे, म्हाळुंगे गावचे सरपंच मा. मयूर भांडे, संकेत लोंढे, अनिकेत बनसोडे, महेश भांडे, अविनाश अंबुरे, आदेश भादर्गे, संकेत डेंगळे, विनायक दळवी, तन्मय सासर, प्रथमेश भांडे तसेच आदेश मदने आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.

See also  पुणे मनपा सामाजिक विकास विभागाकडील मानधन तत्त्वावरील सेवकांना पालिका सेवेत सामावून घेण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद -माजी आमदार मेधा कुलकर्णी