एक्झर्बिया अबोड, जांभूळ सोसायटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी

जांभूळ (ता. मावळ) : विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एक्झर्बिया अबोड सोसायटी, जांभूळ येथे भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, यंदाच्या जयंती सोहळ्याचे संपूर्ण नियोजन आणि आयोजन सोसायटीतील महिला भगिनींनी समर्थपणे पार पाडले.

जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून महिनाभर आधीपासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली होती. अध्यक्ष शोभा गवळी, उपाध्यक्ष सुजाता ठोसर आणि खजिनदार प्रियांका पवार यांनी जबाबदाऱ्या सांभाळत कार्यक्रम यशस्वी केला. मयुरी, सपना, योगिता यांनी वर्गणी संकलन व निमंत्रणाचे काम तर दिपीका वाकडे यांनी स्नेहभोजन व्यवस्थेची धुरा सांभाळली.

१३ एप्रिल रोजी सोसायटीतील मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित भाषणे, नृत्य आणि चारोळ्या सादर करत आपले कलागुण दाखवले. या वेळी सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.

१४ एप्रिल रोजी सकाळी बोधिसत्व गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. कार्यक्रमात वडगाव पोलीस स्टेशनचे उमाजी मुंडे उपस्थित होते. त्यांनी रहिवाशांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात आली असून, आकर्षक सजवलेला जयंती रथ हे प्रमुख आकर्षण ठरले. सोसायटीतील प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन निमंत्रण देण्यात आले होते. प्रियांका पवार आणि प्रा. दत्तात्रय ठोसर यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमानिमित्त सर्व रहिवाशांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सोहळा उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंकज पखाले, सतीश कदम, हिंदुराज गवळी, अनिल लांबतुरे, साहेबराव वाकडे, रोशन पवार, विजय तायडे, मोहन प्रक्षाळे, सुरज कदम, ओंकार गवळी, अभिनंदन ताटके यांच्यासह सर्व सभासद व रहिवाशांनी मोलाचे सहकार्य केले.

See also  भाजपा कोथरूड उत्तर मंडलाच्या वतीने स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन