पावसाळ्यात नागरिकांना आपत्तीला सामोरे जावे लागू नये महापौरांच्या प्रशासनाला सूचना

पुणे : येत्या पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागू नये, यासाठी दक्षता घ्या, अशा सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांनी गुरुवारी पालिका प्रशासनाला दिल्या.

मान्सूनपूर्व तयारीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला अतिरिक्त आयुक्त श्रीमती कौर, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर उपस्थित होते, त्याच बरोबर विविध खात्यांचे खाते प्रमुख ही उपस्थित होते. बैठकीमध्ये मान्सूनच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या मलनि:सारण विभागाअंतर्गत मान्सूनपूर्व तयारीच्या दृष्टीने चालू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पुणे शहरात जी नाला सफाई चालू आहे त्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

तसेच एनडीएमए च्या अंतर्गत केंद्र सरकारकडून पुणे महानगरपालिकेसाठी जे प्रकल्प मंजूर आहेत त्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्याच बरोबर आपत्ती व्यवस्थापन विभाग, रोड विभाग, पर्यावरण विभाग व इतर संबंधित विभागांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.

See also  पुणे महानगरपालिका निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर 41 प्रभागांमध्ये 165 नगरसेवक निवडून येणार