पुणे : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, शहराचा पाणीवापर तसेच आगामी मान्सून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून बांधकाम प्रकल्प, जलतरण तलाव आणि इतर अनावश्यक वापरासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळण्यावर भर देण्यात आला. तसेच गळती नियंत्रण, जनजागृती मोहीम, टँकर व्यवस्थापन आणि संभाव्य पाणी कपातीसाठी पूर्वतयारी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.
बैठकीस मा. महापौर सौ. मंजुषा दीपक नागपुरे, उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम, काँग्रेस गटनेते अॅड. रामचंद्र कदम, शिवसेना गटनेते श्री. नितीन गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) गटनेते अॅड. सोपान चव्हाण, महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त सौ. पवनीत कौर, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा) श्री. नंदकिशोर जगताप तसेच पाटबंधारे विभाग व पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणेकरांना कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार असून मान्सूनची स्थिती व धरणांतील पाणीसाठ्याचा नियमित आढावा घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात येतील.















