बाणेर बालेवाडी पाषाण प्रभाग९ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने
कोथरुड विधानसभा मतदारसंघ प्रभाग निहाय पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली.


यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कोथरुड विधानसभेचे अध्यक्ष स्वप्निल दादा दुधाने, कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे योगेश सुतार शैलेंद्र कदम किशोर कांबळे उपस्थित होते.

यावेळी बाणेर बालेवाडी पाषाण प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

प्रभाग अध्यक्ष सारंग कोळेकर, प्रभाग कार्याध्यक्ष आनंद पडले,  सिद्धांत माने, प्रभाग उपाध्यक्ष हर्षद जाधव,  प्रभाग सरचिटणीस विनोद सोनवणे , प्रभाग चिटणीस रोहन जगताप यांचे नियुक्ती करण्यात आली.

See also  पिरंगुट येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन