मॉडर्न महाविद्यालयात रक्तदान शिबिर; ९५ रक्तदात्यांचा सहभाग

पुणे, दि. २२ : गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘घोलप ब्लड बँक’ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ९५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर १८७ जणांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ पुना, कोथरूडचे प्रेसिडेंट गणेश साने, IWC पुणे रिव्हर रिदमच्या प्रेसिडेंट रिचा बंसल आणि IWC जेन झी क्लबच्या समन्वयक डॉ. निवेदिता दास उपस्थित होत्या.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब ऑफ पुना, कोथरूडचे प्रेसिडेंट गणेश साने, IWC पुणे रिव्हर रिदमच्या प्रेसिडेंट रिचा बंसल आणि IWC जेन झी क्लबच्या समन्वयक डॉ. निवेदिता दास उपस्थित होत्या.यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्यातून विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण होते. आपल्या रक्तामुळे एखाद्याला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे युवकांनी पुढे येऊन अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.”

यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, त्यातून विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण होते. आपल्या रक्तामुळे एखाद्याला जीवनदान मिळू शकते. त्यामुळे युवकांनी पुढे येऊन अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा.”

घोलप ब्लड बँकेचे श्री. हरिदास घोलप म्हणाले, “थॅलेसेमियाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, या रुग्णांना नियमितपणे रक्ताची गरज भासते. अनेकदा प्लेटलेट्सचीही कमतरता जाणवते. अशा रक्तदान शिबिरांमुळे गरजू रुग्णांना मोठी मदत मिळते.”

या रक्तदान शिबिराचा आराखडा अर्थव दळवी आणि साहिल वाबिस्कर या विद्यार्थ्यांनी तयार केला. संजना दाबके, दिव्या मुंजाळ, राज इंदलकर आणि आर्यन गुनावरे या विद्यार्थ्यांनी शिबिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.

NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. कुमोद सपकाळ, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि डॉ. गोविंद कांबळे यांनी शिबिराची धुरा सांभाळली. या उपक्रमास प्राचार्य डॉ. संजय खरात यांचे मार्गदर्शन लाभले.

See also  वाघोलीतील मूलभूत सुविधासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी – मंत्री उदय सामंत

संस्थेचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख आणि संस्थेच्या सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि आयोजक टीमचे अभिनंदन केले.