नवचैतन्य हास्य परिवार पाषाण टेकडी शाखा येथे हनुमान चालीसा व भीमरूपी स्तोत्र पठण

पाषाण : श्री हनुमान जयंती निमित्त “हनुमान चालीसा आणि भीमरूपी स्तोत्र पठण” कार्यक्रमाचे आयोजन भाजप कोथरूड (उ) मतदारसंघ उपाध्यक्ष सौ कल्याणी  टोकेकर आणि भाजप कोथरूड (उ) मतदारसंघ सचिव सौ निकिता माताडे  यांनी नवचैतन्य हास्य परिवार पाषाण टेकडी शाखा येथे  केले.


यावेळी स्तोत्र पठाण आणि आणि ओमकार जप झाल्यावर हनुमान चालीसा प्रती सगळ्यांना देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ रजनी जोशी आणि श्री हरीश पाठक यांचे विशेष सहकार्य लाभले. हास्य आणि योग व्यायाम करणाऱ्या सभासदांनी या उपक्रमाचे स्वागत करून उत्साहाने सहभाग घेतला.

See also  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या धनकवडी केंद्रात २८६ जणांची मोफत रक्त तपासणी