ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

हिवरे (ता. शिरुर) गावातील सावित्रीबाई फुले नगर मधील मुलांना ऋतुध्वज सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवार दि. 29 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा व हायस्कुल मधील शिष्यवृत्तीधारक व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मर्यादित साधने,आर्थिक अडचणी आणि विविध आव्हानांना सामोरे जात असतानाही आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवत यश संपादन करत आहेत,अशा विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासाला आधार मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

शिष्यवृत्ती धारक व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकाच्या घरी जाऊन सन्मानचिन्ह व भेटवस्तू म्हणून स्टडी लॅम्प देऊन मुलांचा तसेच पालकांचा आनंद द्विगुणित करण्याचे काम ऋतुध्वज फाउंडेशन ने केले. यावेळी ऋतुध्वज सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री हेरंब सुधाकर नगरे तसेच त्यांच्या समवेत युवासेना उपजिल्हाप्रमुख पुणे श्री रेवणनाथ गायकवाड, मा.चेअरमन श्री मच्छिन्द्र गायकवाड,श्री सोमनाथ गायकवाड,श्री माऊली भुमकर,श्री सतिश गायकवाड,श्री स्वप्नील भुमकर आदी मान्यवर व पालक तसेच नागरिक उपस्थित होते.

फाउंडेशन च्या माध्यमातून वेळोवेळी अनेक ठिकाणी वेगवेगळे समाजउपयोगी उपक्रम केले जातात आणि असेच उपक्रम यापुढील काळात देखील केले जावे अशा भावना अनेक पालकांनी व नागरिकांनी व्यक्त केल्या त्यावर फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हेरंब नगरे यांनी सुद्धा सकारात्मकता दाखवत भविष्यात आपण वेगवेगळ्या घटकांमधील नागरिकांना शक्य तितकी मदत करणार असल्याचे सांगितले.

See also  बाणेर–पाषाण लिंक रोडवर पार्किंगचा विळखा; पासपोर्ट कार्यालयामुळे वाहतूक कोंडी वाढली, क्षेत्रिय कार्यालयात बैठकीचे आयोजन