कोथरूड : डॉक्टर दिनानिमित्त कोथरूड आणि डेक्कन सह्याद्री हॉस्पिटल, तसेंच कोथरूड भागातील विविध डॉकटरांना भेटून त्यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी चव्हाण क्लिनिकचे डॉ. विवेक चव्हाण, गुरुकृपा क्लिनिकचे डॉ. सोना सिंह कोरेकर, बलरोग तज्ञ डॉ. व्होरा, डॉ. संदीप बुटाला, सनी हॉस्पिटल चे डॉ. राजेंद्र मोरे या सर्वांचा सन्मान आणि सत्कार समाजसेवक, शिवसैनिक, युवा उद्योजक किरण मारणे, उदय भेलके, विभागप्रमुख कोथरूड, यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी, गफूर शेख, विकी कांबळे, राजेश आत्रेकर, योगेश कंधारे,
इत्यादी उपस्थित होते.